Friday 4 October 2013

मलाही आवडेल

तुझ्यासाठी "पाऊस" व्हायला
मलाही खूप आवडेल......
अचानक बरसून 
तुला चिंब चिंब भिजवेल....
तुझ्यासाठी "वारा" व्हायला 
मलाही खूप आवडेल....
मंद झुळूक होऊन हळूच 
गालाला स्पर्श करून पळेल.....
 तुझ्यासाठी "पाणी"  व्हायला 
मलाही खूप आवडेल....
तुझ्या अलगद स्पर्शाने 
स्वर्ग सुख मिळवेन.....
तुझ्यासाठी "अग्नी" व्हायला 
मलाही खूप आवडेल....
तुला त्रास देणाऱ्याला
चांगला होरपळून काढेल.....
तुझ्यासाठी "ब्रम्हा"  व्हायला 
मलाही खूप आवडेल....
तुझ्या प्रत्येक सुखासाठी 
मी "विधीलिखित" च बदलेल.....

तुझ्यासाठी "चांगला माणूस" व्हायला 
मलाही खूप आवडेल....  
माझ्यावर प्रेम करायला 
तुला नक्कीच भाग पाडेल......





No comments: