Sunday 12 November 2017

उसळणाऱ्या लाटां आणि शांत किनाऱ्यांचा एक संगम

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
उसळणाऱ्या लाटां आणि शांत किनाऱ्यांचा,
एक वेगळाच संगम शोभतेस...

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
खोल जखमेवर हळुवार लावलेल्या,
औषधासारखी आल्हाददायक भासतेंस..

डोळ्यांतील अश्रूंना किती अलगत बाहेर काढतेस..
दगडासारख्या मनालाही अलगत भुरळ घालतेस.

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
रखरखत्या उन्हात सावलीसारखी तर,
कडाक्याच्या थंडीत शेकोटीच्या उबदार ज्वालेप्रमाणे भासतेस...

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...

तुझा आणि फक्त तुझा...

Sunday 6 August 2017

एक तू आणि एक मी - मैत्री

मैत्री..

एक तू आणि एक मी,
एवढीच रे आपली कहाणी...

ना मोह पैशाचा,
ना मान-अपमानाचा..
आसुसलेला जीव आपला फक्त,
तुझ्या माझ्या खऱ्या मैत्रीचा...

यशाच्या शिखरावर आहेस,
एक भक्कम आधार...
झाली चूक एखादी तर,
पाहतो तुझा रुद्रावतार...

लांब गेलो कधी तरी आपल्या,
दोस्तीचं नातं नाही संपणार...
तुझ्याविना यारा,
नाही आयुष्याला आकार...

- गोकुळ द. गायखे

दिवसभरात आलेला एकही संदेश (Msg) पुढे पाठवून मैत्री व्यक्त करणे जमलं नाही मला.
माझ्या जिवाभावाच्या मित्रा केवळ तुझ्यासाठी आज वेळ काढून माझ्या भावना थोडक्यात व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Saturday 14 January 2017

आनंदाचा डोंगर

तिळाच्या कणाएवढा तर असतो आनंदाचा क्षण, एक-एक कण एकत्र करून पाहिले तर आनंदाचा डोंगर उभा राहू शकतो.

येणारे नवीन वर्ष आपणास अश्याच आनंदाच्या आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाओ हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : गोकुळ द. गायखे आणि सहपरिवार

Monday 24 October 2016

दिवाळी चायना वस्तूंशिवाय

दिवाळीच्या खरेदीनिमित्त भटकंती सुरु होती. एका हातगाडीवर पणती आणि दिवाळीचे साहित्य असलेल्या एका माणसाकडे वळलो. परिस्थिती बहुदा अगदी सामान्य असावी, असो त्यांच्या चेहऱ्यावर आणि ग्राहकांशी बोलताना असणारी अदब पाहून थक्क झालो. सहज म्हटलं "या वस्तू चायनाच्या तर नाहीत ना ? असतील तर नका देऊ म्हणून " तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे खरंच मार्मिक होत...नाही साहेब, यावर्षी एक सुद्धा चायनाची वस्तू नाही ठेवली, धंदा नाही झाला तरी चालेल पण चायना नाही विकायचा. तेव्हा ठरवलं या व्यक्तीकडूनच थोडेफार का होईना सामान खरेदी करू म्हणजेच चांगल्या विचारांना आणि प्रयत्नांना थोडासा हातभार लाभेल.आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं आहेत जी जगण्यासाठी शर्थीने प्रयन्त करत असतात. आपणही त्यांना जमेल तितके सहकार्य करू आणि आपल्या स्वदेशी वस्तू विकत घेऊ.. - हि दिवाळी चायना वस्तूंशिवाय साजरी करू. - माझ्या भारतीय सैनिक आणि पोलीस बांधवाना दीपावलीच्या शुभेछया. - वयस्कर व्यक्तींकडून खरेदी करताना गरज नसताना भाव कमी करत बसू नका कारण ते जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करत असतात. - कमीत कमी फटाके - कमीत कमी धूर....साजरी करू दीपावली आणि पर्यावरणाचा राखू समतोल.
आपण सर्वाना दीपावलीच्या मनापासून शुभेछया.. हि दीपावली आपणांसर्वांना आनंदाची आणि भरभराटिची जावो हीच सदिछया.
- गोकुळ द. गायखे.