Friday 4 October 2013

मला माहित आहे सखे !

मला माहित आहे सखे !



एके दिवशी मी cycber मध्ये बसलो असताना माझी ओळख एका स्त्रीशी झाली,सर्व साधारणपणे तिचं वय वर्ष २२ किवां २३ असावं , एकदोनदा आम्ही cyber मध्ये भेटलो होतो पण एकमेकांशी बोललो नाही कधी , बिचारी आताच लग्न झालं होतं तिचं , जेव्हा ती आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच नेहमीच हसू आज कुठे तरी गायब झालं होत.मी सहज विचारलं काय ताई ! काय बोलता बोलता सहज बोलून गेली ती "खूप काम कराव लागतं घरी ,सर्व जबाबदारी एकटीलाच पार पाडावी लागतात म्हणून  वैगरे .... ",
त्यावर त्यांना मी जास्त नाही पण थोड्या फार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या अन त्यांना त्या पटल्या सुद्धा...मला हि खूप बर वाटलं. माझ्या अश्या समजवण्याच्या रीतीला त्यांनी त्यांच्या यांच्याशी मोजून तोलून पाहिलं ,सुरवातीला मला गंमत वाटली खरी पण नंतर जरा बर वाटलं कि "चला आहे कुणी तरी जे माझ्यासारखा विचार करतंय ".
रात्री घरी आलो जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना सहज विचार मनात आला कि जर,
 माझ्याही हिने (जी कुणी माझ्या नशिबी असेल तिने भविष्यकाळात) मला अशी तक्रार केली तर तिला मी काय उत्तर देणार ? तिला कसा समजावणार ?
अन सहजच माझे मन शब्धरूपी स्वरूपातून कागदावर उमटत गेले......  

No comments: