दिवसाची सुरुवात....
जरा खराबच झाली.
झुक झुक करत प्रवासाची ,
गाडी हि निघाली.....
प्रवासात मला एक ,
मस्त पोरगी दिसली....
का कुणास ठाऊक ,
तीही पाहून हसली...
जागा नव्हती गाडीत म्हणून ,
मला सरकवून बसली...तिचा स्पर्श होताच,
माझी बोबडीच वळली.
चुकून माकून का होईना ,
आमची जोडी जमली...
.
.
.
.
.
.
.
.
वर्षभराच्या या गोष्टीस आता,घटका भरत आली.....
काल पहिल्यांदा दोघात,
खूप मोठी भांडणे झाली....
आठवणीत तिच्या मात्र ,
माझी झोपच उडाली....
हो..नाही..करता करता ,
भरपूर वेळ गेली....
मी नाही म्हणून ती ,
दुसरीकडे "एन्गेज" झाली...
दिवसाची सुरुवात....
जरा खराबच झाली.
झुक झुक करत प्रवासाची ,
झुक झुक करत प्रवासाची ,
गाडी हि निघाली.....

1 comment:
एकदम मस्त!!!!! गोकुळ ... छान
Post a Comment