आपण म्हणतो माझा निर्णय चुकला कारण माझी निर्णय घेण्याची वेळ योग्य नव्हती वैगरे...बऱ्याचदा आपला वेळच इतका खराब असतो
कि आपण कोणताही निर्णय घेतला कि त्याचा परिणाम (result ) हा नकारात्मकच येतो असेच वाटते प्रत्येकाला आणि असे वाटणे स्वाभाविकच असते कारण आपण मनुष्य आहोत दैव नाही.
आजपर्यंत माझा खूप निर्णय चुकले परंतु त्यामागे कारण माझ्या खराब वेळेचे नव्हते तर कारण होते फक्त माझी मानसिकता.....कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहणे फार महत्वाचे असते पण आपल्यापैक्की बरेच जन सुरुवातीचा काळ आपल्या निर्णयावर ठाम असतात परंतु हळू हळू मात्र आपण या ध्येयावरून विचलित होत जाते ....कालांतराने आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे वाटू लागते आणि त्यात आपण त्या वेळेला दोष देणं सुरु करतो ज्या वेळेला आपण तो निर्णय घेतला होता. परंतु यात वेळेचा काय दोष ? हि तर आपलीच मानसिकता मग ती सकारात्मक असो व नकारात्मक !!आपण वेळेवर अवलंबून असतो वेळ आपल्यावर अवलंबून नसते .....कितेक विचारवंतानी म्हटले आहेच ना "प्रत्येक क्षण महत्वाचा असतो" आपण हि हे मान्य करतोच ना मग वेळ शुभ अशुभ कशी काय होऊ शकते...आजपर्यंतच्या अनुभवावरून मी एका निष्कार्ष्यापर्यंत पोहचलो की, "माझ्या आयुष्यात वाईट वेळ कधीच नव्हती , जे काही चांगले वाईट प्रसंग आले ते फक्त माझ्या मानण्यावर अवलंबून होते अन राहतील ही !! वेळेने कधीच मला दगा दिला नाही परंतू मीच कित्येकदा वेलेशीच खेळत बसलो अन बरेच काही गमावून धन्यही झालोय. कित्येक वाईट कटू अनुभवातून जीवनाचे खरे रहस्य मला उलगडण्यास मदत झाली. " आणि त्याचच फळ म्हणजे हा माझा ब्लॉग...धन्यवाद !!
आई-बाबा,परमेश्वर आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद!!

No comments:
Post a Comment