Friday, 4 October 2013

महत्वाचं तरी काय ?


महत्वाचं तरी काय ?

आयुष्यात सांगा ...
                                   महत्वाचं तरी काय ?
                                  मातेशिवाय मुलाचं ...
अस्तित्व तरी काय ?
गोष्ट हि खरी 
पण निराळीच हाय ...
आयुष्यात सांगा ...
महत्वाचं तरी काय ?
आजीशिवाय गोष्टींची.. 
मज्जा तरी काय ?
बाबांशिवाय खेळाची या 
गंमतच काय ?
गोष्ट हि खरी 
पण निराळीच हाय ...
आयुष्यात सांगा ...
महत्वाचं तरी काय ?
प्रेमाशिवाय सांगा ...
जीवन तरी काय ?
दग्याशिवाय प्रेमाची..
कदरच होत नाय .....
गोष्ट हि खरी 
पण निराळीच हाय ...
आयुष्यात सांगा ...
महत्वाचं तरी काय ?
पैश्याशिवाय आयुष्यात 
रंगतच नाय .......
का कुणास ठाऊक ? वाटतं
आयुष्य हरवते कि काय ?
खंत या मनाची...
जरा वेगळीच हाय ....
आयुष्यात सांगा ...
महत्वाचं तरी काय ?
गोष्ट हि खरी 
पण निराळीच हाय ...
मन हे वेड...
    कुठे रमतच नाय ....
 शेवटाशिवाय कुठेही
    सुरुवात होत नाय ....
   आयुष्यात सांगा ...
      आपण करतो तरी काय ?
सांगा मज आयुष्याचे
आपल्या गमक तरी काय?
Facebook वरच्या Timepass 
शिवाय दुसरे येते तरी काय ?
वेळेचं गणित कधी 
सुटता सुटत नाय ....
आयुष्यात सांगा ...
महत्वाचं तरी काय ?
प्रश्न मोठा हाय...
जरा विचार करून पाय...
आयुष्यावर प्रेम कर ....
ते खूप सुंदर हाय....


गोष्ट हि खरी 
पण निराळीच हाय ...
आयुष्यात सांगा ...
महत्वाचं तरी काय ?

गोकुळ दत्तू गायखे 


No comments: