काही लोक इतके स्वार्थी असतात कि ज्यांना आपल्या स्वार्था पुढे इतरांच्या भावना काडीमात्र वाटतात. खरच मलाही माझ्या आजतागायत आयुष्यात खूप लोक भेटली , ते फक्त कामापुरतेच म्हणतात ना ! गरज सरो अन वैद्य मारो अश्या उक्तीप्रमाणे मी मात्र वैद्य बनून राहिलो अन इतर मात्र ..............
चला ! अश्या लोकांना त्यांचे नशीब लखलाभ राहो. एकूणच काय तर काळ बदलत चाललाय अन आपण मागे राहिलो. आयुष्य हे चालत्या रेल्वे प्रमाणेच भासते जशी रेल्वे प्रत्येक प्लाटफॉर्म वर थांबते अन कित्येक प्रवाश्यांशी घड्सन होते तशी आपलीही आयुष्यात प्रत्येक थांबावर कित्येकांशी मैत्री व घड्सन होते. आगंतुकपणे मैत्रीतर करून जातो परंतू त्याचा मात्र खूप फायदा घेतला जातो हे मात्र सर्वज्ञात आहे अन राहणारच आहे.
मला कोणाच्याही भावनांशी खेळायचे नाही मी मात्र एक छोटासा प्रयत्न केलाय... मी एक 'अनामिक ' आहे.माझ नाव ......अन माझ्या मित्राच्या (ब्लोग) च्या सहाय्याने मी आपणास एकाच सांगू इच्छितो की आपण मात्र असं वागायचं नाही कारण जर आपण असे वागलो तर इतरांमध्ये अन आपल्यामध्ये काय फरक ? मला आज खूप त्रास होतोय पण.....
चला कित्येक गोष्टी मनात असूनही बाहेर येत नाहीत. खर्च जग मला वेद समजतही असेल परंतू मी हा असाच आहे.
धन्यवाद !
गोकुळ मला थोड बोलून अन लिहून दिल्याबद्दल.
!! अनामिक !!



No comments:
Post a Comment