झाली पुस्तकांची गर्दी
झाली पुस्तकांची गर्दी
उडाली गोकुळची तंद्री !
झाली पुस्तकांची गर्दी
तुटली खेळांची फांदी !!
झाली पुस्तकांची गर्दी
विज्ञानाने उडवली दांडी !
झाली पुस्तकांची गर्दी
इतिहासाने दिली छडी !!
झाली पुस्तकांची गर्दी
भूगोलाची झाली वडी !
झाली पुस्तकांची गर्दी
उडाली गोकुळची तंद्री !
झाली पुस्तकांची गर्दी
उडाली गोकुळची तंद्री !
माझी आठवण :- शाळेत असताना आपण सर्वजण प्रत्येक गोष्टींचा बाऊ करत असायचो.
हा विषय कठीण तो कठीण असं करत करत आपण इथपर्यंत येऊन पोहचलो आहोत परंतू तेच विषय आपल्याला आता इतके सोपे वाटतात कि विचारताच सोय नाही. माझी लहान भाची हि विषयांचा बाऊ करत असते , तिच्यामुळेच मला माझे पूर्वीचे दिवस आठवले अन सहजच काही लिहून गेलो
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment