Friday, 4 October 2013

कधी कधी वाटतं

कधी कधी वाटतं ....
कधी कधी वाटतं 
टाटा बिर्लाच बनावं
उरलेलं आयुष्य 
राजाप्रमाणे जगावं !!
कधी कधी वाटतं 
अक्टरच बनावं 
स्वतःवर पिक्चर काढून 
Dhinka Chikka करावं !!
कधी कधी वाटतं 
राजकारणी व्हावं
Politics मध्ये जाऊन 
सोलिड Famous व्हावं !!
कधी कधी वाटतं 
teacher च व्हावं 
शाळेमध्ये जाऊन 
पोरांना झोडून काढावं !!
कधी कधी वाटतं 
Driver च व्हावं 
चार-पाच गाड्या घेवून 
जगभर फिरावं !!
कधी कधी वाटतं 
संन्यासीच व्हावं 
घर-संसार सोडून  
टाळ कुटतच बसावं !!
कधी कधी वाटतं
मोठा भाईच व्हावं 
मला डिवचनारयाला
चांगलं सोलूनच काढावं !!
कधी कधी वाटतं 
चांगला माणूस व्हावं 
का जगलो म्हणून शेवटी 
अचानकच मरावं .....अचानकच मरावं !!  

-- गोकुळ गायखे        

    last 7 days 

No comments: