Friday, 4 October 2013

आईस आवडलेली हि माझी पहिली



माझ्या आईस आवडलेली हि माझी पहिली कविता ...

कोठे पाण्याचा खळखळाट ,
कोठे कोरडे माळरान ,
पिक पिकत पिकेना ,
होई जीवाची उलघाल !!१!!

पाटाच पाणी जात ,
उभ्या जमिनीत मुरत ,
पिकाच्या वाढीसाठी बिचार ,
किती - किती झुरत !!२!!
नशिबी आहे त्याच्या ,
नकली खतांचा मारा ,
सावकाराच्या कर्जाचा आहे ,
माठीमागे ससेमिरा  !!३!!
                                 उभा कापूस जळला ,
सगळा ऊसच  झोपला ,
बाकीची झाली माती ,
भरली कुडाचीच पोती !!४!! 
( जुन्या दिवसांची आठवण..... )
                                                                             
- गोकुळ गायखे 
कविता सुचण्याचे कारण कि ;

भरत जाधवचा "झिंग चिक झिंग" चित्रपट पहिला आणि वाटलं कशी कशी जगतायेत लोक अन आपण क्षणातच हिमत  हरवून बसतो तीसुद्धा विनाकारण .....
चित्रपट पाहून डोळ्यात पाणी आल खर पण आज ते आयुष्यात मला काही चांगलं शिकवून हि गेलं...

१. "तुम्हाला आयुष्यात जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे महत्वाचे आस्ते कारण सुरुवातीचे अपयश यशाचा खरा पाया असतो."

२. "आनंद असो किवा दु:ख डोळ्यातले अश्रू कधीच खोटं बोलू शकत नाहीत ...ते फक्त ओळखता आले पाहिजे."

३."अपेक्षांचा भंग होणे स्वाभाविक असते कारण भंग अपेक्ष्याच नवीन परंतु सरस अश्या अपेक्ष्यांना जन्म देतात."

४."मदतीचा हात पुढे येतो परंतु त्यासाठी आपणसुद्धा नमते व एक पाऊल पुढे सरले पाहिजे." 

हाच चित्रपट पाहून आमचे जुने दिवस आठवले खरचं कधी कधी या आठवणी खूप खूप आनंद देतात तर कधी कधी डोळ्यात अश्रू .....
सगळा आठवणींचा खेळ आहे हा ......



No comments: