Friday, 4 October 2013

लग्न झालेल्या माझ्या मित्रांसाठी...




   नवीनच लग्न झालेल्या माझ्या मित्रांसाठी...


प्रिय ______

तुला पहिला अन 
तुझ्या प्रेमातच पडलो 
बाहेर पडण्याच्या नादात 
खोलवर रुतत गेलो !!

तुझा आवाज ऐकला अन
मंत्रमुग्ध झालो 
तुला विसरण्याच्या नादात 
स्वतःलाच हरवून बसलो !!

तू कशी असशील फक्त 
कल्पनाच करत होतो 
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत 
तुलाच पाहत होतो !!

तू हो म्हणालीस म्हणून 
धन्य धन्य झालो
सप्तपदी घेताना मात्र 
तुझ्याशी एकरूप झालो !!

तुझाच _____

पंडित श्री गोकुळ गायखे.

No comments: