हळूच येणारा वारा
हळूच येणारा वारा ,
खरंच!! राजा मात्र शेवटपर्यंत एकटाच राहतो....
मनाला गारवा देऊन जातो !!
किंचित पाहिलेला चेहरा ,
सतत नजरेसमोर येतो !!
काडीचाही गंध नसलेला ,
अचानक प्रेमात पडतो !!
पट्टीचा पोहणाराही ,
पट्टीचा पोहणाराही ,
गटांगळ्या खाऊन मरतो !!
न भूतो न भविष्याती ,
खेळही घडून जातो !!
उभ्या सारीपाठावर मात्र ,
राजा एकटाच उरतो !!
मुका सुद्धा अचानक ,
भडभडा बोलत सुटतो !!
अक्षरांच्या गर्दीत ,
बिचारा फळाच हरवून जातो !!
दु:खातही तो ,
सतत हसत असतो !!
थोडक्यासाठी तो ,
भरपूर गमावून बसतो !!
पण ....
हळूच येणारा वारा ,
मनाला गारवा देऊन जातो !!
उभ्या सारीपाठावर मात्र ,
राजा एकटाच उरतो !!
.
.
.
.
- गोकुळ गायखे( ९८२१८३७३४३)


No comments:
Post a Comment