होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबांच्या खिशात डोकेदुखीची गोळी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
विरोधक सतत यांच्याच खोडी काढी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
घोटाळे यांचे मिडिया उकरून काढी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
रस्त्यांवर झाली खड्ड्यांची जाळी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
शाळेच्या पुस्तकात चुका ! लंय भारी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
आमच्या करता मात्र आश्वासनांची गोळी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
झाली चूक आता एकदाची कळली !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
चुका सुधारण्याची आली वेळ खरी !!
होळी रे होळी पुरणाची पोळी
!! होळी रे होळी !!
!! होळी रे होळी !!
: -गोकुळ गायखे

No comments:
Post a Comment