Sunday, 12 November 2017

उसळणाऱ्या लाटां आणि शांत किनाऱ्यांचा एक संगम

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
उसळणाऱ्या लाटां आणि शांत किनाऱ्यांचा,
एक वेगळाच संगम शोभतेस...

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
खोल जखमेवर हळुवार लावलेल्या,
औषधासारखी आल्हाददायक भासतेंस..

डोळ्यांतील अश्रूंना किती अलगत बाहेर काढतेस..
दगडासारख्या मनालाही अलगत भुरळ घालतेस.

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
रखरखत्या उन्हात सावलीसारखी तर,
कडाक्याच्या थंडीत शेकोटीच्या उबदार ज्वालेप्रमाणे भासतेस...

तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...
तू अशीच हसत रहा, खूप छान वाटतेस...

तुझा आणि फक्त तुझा...

Sunday, 6 August 2017

एक तू आणि एक मी - मैत्री

मैत्री..

एक तू आणि एक मी,
एवढीच रे आपली कहाणी...

ना मोह पैशाचा,
ना मान-अपमानाचा..
आसुसलेला जीव आपला फक्त,
तुझ्या माझ्या खऱ्या मैत्रीचा...

यशाच्या शिखरावर आहेस,
एक भक्कम आधार...
झाली चूक एखादी तर,
पाहतो तुझा रुद्रावतार...

लांब गेलो कधी तरी आपल्या,
दोस्तीचं नातं नाही संपणार...
तुझ्याविना यारा,
नाही आयुष्याला आकार...

- गोकुळ द. गायखे

दिवसभरात आलेला एकही संदेश (Msg) पुढे पाठवून मैत्री व्यक्त करणे जमलं नाही मला.
माझ्या जिवाभावाच्या मित्रा केवळ तुझ्यासाठी आज वेळ काढून माझ्या भावना थोडक्यात व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Saturday, 14 January 2017

आनंदाचा डोंगर

तिळाच्या कणाएवढा तर असतो आनंदाचा क्षण, एक-एक कण एकत्र करून पाहिले तर आनंदाचा डोंगर उभा राहू शकतो.

येणारे नवीन वर्ष आपणास अश्याच आनंदाच्या आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाओ हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : गोकुळ द. गायखे आणि सहपरिवार

Monday, 24 October 2016

दिवाळी चायना वस्तूंशिवाय

दिवाळीच्या खरेदीनिमित्त भटकंती सुरु होती. एका हातगाडीवर पणती आणि दिवाळीचे साहित्य असलेल्या एका माणसाकडे वळलो. परिस्थिती बहुदा अगदी सामान्य असावी, असो त्यांच्या चेहऱ्यावर आणि ग्राहकांशी बोलताना असणारी अदब पाहून थक्क झालो. सहज म्हटलं "या वस्तू चायनाच्या तर नाहीत ना ? असतील तर नका देऊ म्हणून " तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे खरंच मार्मिक होत...नाही साहेब, यावर्षी एक सुद्धा चायनाची वस्तू नाही ठेवली, धंदा नाही झाला तरी चालेल पण चायना नाही विकायचा. तेव्हा ठरवलं या व्यक्तीकडूनच थोडेफार का होईना सामान खरेदी करू म्हणजेच चांगल्या विचारांना आणि प्रयत्नांना थोडासा हातभार लाभेल.आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं आहेत जी जगण्यासाठी शर्थीने प्रयन्त करत असतात. आपणही त्यांना जमेल तितके सहकार्य करू आणि आपल्या स्वदेशी वस्तू विकत घेऊ.. - हि दिवाळी चायना वस्तूंशिवाय साजरी करू. - माझ्या भारतीय सैनिक आणि पोलीस बांधवाना दीपावलीच्या शुभेछया. - वयस्कर व्यक्तींकडून खरेदी करताना गरज नसताना भाव कमी करत बसू नका कारण ते जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करत असतात. - कमीत कमी फटाके - कमीत कमी धूर....साजरी करू दीपावली आणि पर्यावरणाचा राखू समतोल.
आपण सर्वाना दीपावलीच्या मनापासून शुभेछया.. हि दीपावली आपणांसर्वांना आनंदाची आणि भरभराटिची जावो हीच सदिछया.
- गोकुळ द. गायखे.

Thursday, 21 August 2014

शाळेत जा, शिका मोठं व्हा !

'ज्यांनी शिक्षण घेतले नाही त्यांना त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही...'
नेहमीप्रमाणे कार्यालयात निघालो होतो, रस्त्यात काही सफाई कामगार साफसफाई करत होते. त्यांच्या अगदी बाजूलाच काही शाळकरी मुले खेळत होती, त्यातील एक मुलगा सारखा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातगाडीला मागेपुढे ढकलत होता, त्याला बहुतेक गंमत वाटत होती, 
परंतु त्यामधील एका कर्मचाऱ्याला त्या मुलाचा राग येत असावा म्हणून तो त्याला सारखा बाजूला जाण्यास बजावत होता, परंतु मुलगा काही त्याचा उपक्रम सोडण्यास तयार होइना.
मलाही थोडा विचित्र वाटलं, त्या लहान मुलावर रागावून काय मिळणार होतं त्या कर्मचाऱ्याला ?
परंतु क्षणातच माझ्या कानावर काही शब्द पडले ते ऐकून मला त्या व्यक्तीच्या रागावण्याचा खरा अर्थ उमगला...
“अरे ! जा रे बाबा, शाळेत जा, शिका मोठं व्हा ! वेळ गेली तर नंतर जाणीव होवूनही काही होणार नाही...”

खरंच, त्या मुलाला काही समजले की नाही हे मला ठाऊक नाही परंतु मला मात्र त्या व्यक्तीच्या रागामागील अस्पष्ट काळजी, खंत याची जाणीव अश्रुनी डबडबलेल्या त्या अनोळखी डोळयांकडे पाहून झाली.
- गोकुळ

Sunday, 6 April 2014

ये आंसू....




ये आंसू भी बडे अजीब होते है...
किसी को ख़ुशी मै तो, 
किसी को गम मै रुला देते है...

ये आंसू भी बडे अजीब होते है...
कभी समुंदर से खारे पाणी कि तऱ्ह तो ,
कभी शेह्द जैसे मीठे लगते है...

ये आंसू भी बडे अजीब होते है... 
किसी के पास होने का एहसास दिलाते है तो,
किसी के खोने के दर्द को बयान करते है...

ये आंसू भी बडे अजीब होते है...
जब चुपाना चाहो तो बह जाते है,
छुपी हुई दास्तान को बया कर जाते है...

ये आंसू भी बडे अजीब होते है... 
किसी के पास होने का एहसास दिलाते है तो,
किसी के खोने के दर्द को बयान करते है...

Thursday, 13 February 2014

आजही त्या गुलाबाला...

आजही त्या गुलाबाला...


सांगून सांगून थकलो ...
पण तुला प्रेम काही समजेना !!
लिहून लिहून थकलो,
पण तुला कविता काही उमजेना !!

शब्दांची सांगड घालताना,
त्यांचा क्रम काही लागेना !!
आजही त्या गुलाबाला,
त्याचं प्रेम काही भेटेना !!
- गोकुळ 

Thursday, 6 February 2014

तू खेळशी माझ्या मनाशी...



तू खेळशी माझ्या मनाशी,
मी बापडा खेळतो शब्दांशी...
स्पर्श तुझा अजुनी हृदयाशी,
आठवणी आहेत खुळ्या उशाशी....
                                                  - गोकुळ

Friday, 29 November 2013

मैत्री - Google`s Awesome Video

अप्रतिम मैत्रीच्या अबोल भावना....




Tuesday, 12 November 2013

कुणाच्यातरी प्रेमात पडावं ...




कुणाच्यातरी प्रेमात पडावं ,
अशी कधी इच्छा झालीच नाही

दोन घटका भेटीसाठी तडफड व्हावी,
अशी कधी इच्छा झालीच नाही

कुणी मायेची फुंकर घालावी,
अशी कधी इच्छा झालीच नाही

कुणीतरी स्वप्नात येऊन बैचैन करावे,
अशी कधी इच्छा झालीच नाही

स्थिर मन सैरभैर होऊन जावे,
अशी कधी इच्छा झालीच नाही

कुणालातरी कमावल्यानंतर गमवावे,
अशी कधी इच्छा झालीच नाही

                                                                      
 - गोकुळ गायखे


Thursday, 7 November 2013

Life is not fair..

Life is not fair - get used to it!The world doesn't care about your self-esteem. The world will expect you to accomplish something BEFORE you feel good about yourself.You will NOT make $60,000 a year right out of high school. You won't be a vice-president with a car phone until you earn both.
If you think your teacher is tough, wait till you get a boss.



Flipping burgers is not beneath your dignity. Your Grandparents had a different word for burger flipping: they called it opportunity.


Search And Learn 

 If you mess up, it's not your parents' fault, so don't whine about your mistakes, learn from them.


Before you were born, your parents weren't as boring as they are now. They got that way from paying your bills, cleaning your clothes and listening to you talk about how cool you thought you were. So before you save the rain forest from the parasites of your parent's generation, try delousing the closet in your own room.


Search And Learn

Your school may have done away with winners and losers, but life HAS NOT. In some schools, they have abolished failing grades and they'll give you as MANY TIMES as you want to get the right answer. This doesn't bear the slightest resemblance to ANYTHING in real life.



Life is not divided into semesters. You don't get summers off and very few employers are interested in helping you FIND YOURSELF. Do that on your own time.



Television is NOT real life. In real life people actually have to leave the coffee shop and go to jobs.



Be nice to nerds. Chances are you'll end up working for one.
Search And Learn

Smoking does not make you look cool. It makes you look moronic. Next time you're out cruising, watch an 11-year-old with a butt in his mouth. That's what you look like to anyone over 20. Ditto for "expressing yourself" with purple hair and/or pierced body parts.



You are not immortal. (See Above Rule) If you are under the impression that living fast, dying young and leaving a beautiful corpse is romantic, you obviously haven't seen one of your peers at room temperature lately.
Enjoy this while you can. Sure parents are a pain, school's a bother, and life is depressing. But someday you'll realize how wonderful it was to be a kid. Maybe you should start now.






Source - Click Here To Visit

Sunday, 27 October 2013

तुझ्या उत्तराची वाट पाहतोय...


प्रिय
खरं तर मला हा अधिकार आहे का नाही, हे ठरायचे आहे. तरी मी तुला प्रिय म्हणतो. कारण यानंतर तो कदाचित मला अधिकार मिळू शकेल, किंवा मिळणारही नाही. म्हणूनच प्रिय......
मी यापूर्वी कधीच असे पत्र लिहिलेले नाही. कदाचित इतक्यांदा मला प्रेम झाले नसेल, किंवा तुला आता पत्र पाठवण्याची हिच योग्य वेळ असेल म्हणून. म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितोय.
गेल्या चार वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्यात चांगली मैत्री आहे. नकळत दररोज एकमेकांना आपण भेटतो, आणि एसएमएस, नेट चॅटींगही करतो. जोपर्यंत आपण एकत्र असतो, तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या मनाला स्पर्श करत असतो. तो मी आता पत्रांतून मांडू आणि सांगू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.
पण आज अचानक तू, नाही मी, नाहीच मुळी, पावसाने तुझी आठवण करून दिली. मी खिडकी बाहेर डोकं काढलं, मला एक जोडपं जाताना दिसलं, आणि मला असा भास झाला, की, ते दोघे आपणच आहोत. आपलंच प्रेम या पावसाच्या टपोऱ्या थेंबांमध्ये एकमेकात गुंतत, एकमेकांना आधार देत, आणि एकमेकांच्या भावनांमध्ये चिंब भिजत जातेय. मला तुझी इतकी आठवण आली की चक्क, ते पावसाचे थेंब माझ्या पापण्यांना ओलावून गेले.
मन जड झालं, आणि एक विचित्र अस्वस्थता मला जाणवू लागली, वाटलं, आता सारी बंधनं तोडावीत, चटकन फोन उचलून तुला फोन करून मनातील साऱ्या भावना व्यक्त कराव्यात आणि सांगून टाकावं...... मला तू खूप आवडतेस.... इतक्याच वीज कडाडली. शुद्ध आली. वाटलं हे सारं मी केल्यावर जर  तू नाही म्हटलंस तर....? तर मी ते एक्सेप्ट करू शकेल?
तुला माझ्याबद्दल काय वाटेल? तू म्हणशील यासाठी तू माझ्याशी मैत्री केलीस? यासाठी तू माझी इतकी काळजी घ्यायचास?
या प्रश्नांनी माझे दोन दिवस वाया गेले. आणि मग ठरवलं, काही झालं तरी तुला जे खरं आहे, ते सारे सांगायचे. अगदी सारे काही.......
एसएमएस पाठवण्याचे धाडस मी केले नाही, कारण त्यातून समज कमी परंतु गैरसमज जास्त होतात. आपण दोघांनीही ते अनुभवले आहे. नेटवरची चॅटींगही महाग आहे. बाबांना हिशोब द्यावा लागतो त्यात सारखे इंटरनेटवर पैसे खर्च केल्याचे दिसले तर बाबही रागावतात. मग सर्वात चांगले साधन म्हणजे पत्र. आणि म्हणूनच आज मी तुला या पत्रातून विचारतो आहे.
माझ्याशी लग्न करशील? नाही आता लगेच नाही. मी आता शिकतोय नं? मला नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करूयात. तुला हे सारे वाचून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे. हे पत्र वाचल्यानंतर तुला जर राग आला तर प्लीज.. प्लीज मला तू सांग. हवं तर शिव्या दे, माझ्यावर रागव, पण अबोला धरू नकोस..
तुझा नकार एकवेळ मोठ्या मुश्किलीने मी पचवू शकेन गं, पण तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार...

तुझ्या उत्तराची वाट पाहतोय...

तुझाच

आशिर्वादाची शिदोरी

माझ्या मोठ्या ताईचं लग्न झालं तेव्हा मी लहानच होतो , कधी समजलेच नाही कि लग्नं झाल्यावर सासरी जाताना मुलगी इतकी का रडत असते....पण आज त्याचं कारणही समजले अन तेच मी माझ्या शब्दात सांगू इच्छितो....

                                                 "आपल्यांपासून दूर जाताना खूप त्रास होतो"
अखंड चाललेल्या प्रवासाला अचानक थांबा मिळतो ,
मधूनच एखादी नवी वाट गवसते....
मनालासुद्धा त्या वाटेवरती चालावेसे वाटते.
वाटेवरून चालताना जोडीदाराची गरज लागते
जोडीदाराच्या विश्वासाने आयुष्य मार्गी लागते....
आयुष्याची गाडी तुफान वेगाने धावत सुटते....
आयुष्य जगताना आशिर्वादाची शिदोरी लागते."

ओल्या डोळ्यांनी मुलगी म्हणते ,
आई ! आता मी सासरी जाते ....

Thursday, 10 October 2013

भारताला गरज आहे !


           येथे तरुण पिढीला इंटरनेट आणि हातातले मोबाईल यांनी आपल्या विळख्यात असे काही ओढले आहे कि त्यांचेच काय तर आपले सुद्धा भवितव्य अंधारात असल्याची जणू काही हि पूर्वसूचनाच भासते,
परंतु ,आपल्यामध्ये हि अशी काही माणसं आहेत कि, जी या सर्व गोष्टींपासून कितीतरी अंतर दूर असूनही इतरांना प्रगतीच्या वाटेवर घेवून येण्यासाठी धडपड करत आहेत. अश्या थोर आमटे परिवाराला आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येकाला माझा साष्टांग दंडवत. 
        "खरच भारताला गरज आहे ती अश्या थोर व्यक्तींची , विचारांची आणि तुम्हा-आम्हां सर्वांची…."  


Saturday, 5 October 2013

Dr Prakash Amte



Dr.Prakash Amte and Mandakini Amte

















One of the grate human being is with panvelkar`s.


Everyone should read - "Prakashvata" - By Dr.Prakash Amte

Thanks to Santosh Takale for Video Collection`s.





Friday, 4 October 2013

कसलासा विचार मनात येतो.......

कसलासा विचार मनात येतो.......
कसलासा विचार मनात येतो 
नकळत डोळ्यात पाणी देऊन जातो ...
कसलासा विचार मनात येतो 
पक्ष्यांचा थवा भुर्र उडून जातो.....
कसलासा विचार मनात येतो 
क्षणात आयुष्य बदलून जातो.....
कसलासा विचार मनात येतो 
दु:ख सारे विसरून जातो....
कसलासा विचार मनात येतो 
स्वप्नं पाहायला भाग पडतो....
कसलासा विचार मनात येतो 
हरवलेल्या क्षणासाठी जीव कासाविस होतो....
                                का कुणास ठाऊक पण .....
कसलासा विचार मनात येतो 
     आठवण तुझी देऊन जातो.....

गोकुळ गायखे 

गाडी हि निघाली.....

दिवसाची सुरुवात....
जरा खराबच झाली.
झुक झुक करत प्रवासाची ,
गाडी हि निघाली.....
प्रवासात मला एक ,
मस्त पोरगी दिसली....
का कुणास ठाऊक ,
तीही पाहून हसली...
जागा नव्हती गाडीत म्हणून ,
मला सरकवून बसली...तिचा स्पर्श होताच,
 माझी बोबडीच वळली.
चुकून माकून का होईना ,
  आमची जोडी जमली...
 .
.
.
.         
   
.
.
.
.
वर्षभराच्या या गोष्टीस आता,घटका भरत आली.....
काल पहिल्यांदा दोघात, 
खूप मोठी भांडणे झाली....
आठवणीत तिच्या मात्र ,
माझी झोपच उडाली....
हो..नाही..करता करता ,
भरपूर वेळ गेली....
मी नाही म्हणून ती ,
दुसरीकडे "एन्गेजझाली...   
दिवसाची सुरुवात....
जरा खराबच झाली.
 
झुक झुक करत प्रवासाची ,
गाडी हि निघाली.....

निर्णय चुकला !!


आपण म्हणतो माझा निर्णय चुकला कारण माझी निर्णय घेण्याची वेळ योग्य नव्हती वैगरे...बऱ्याचदा आपला वेळच इतका खराब असतो
 कि आपण कोणताही निर्णय घेतला कि त्याचा परिणाम (result ) हा नकारात्मकच येतो असेच वाटते प्रत्येकाला आणि असे वाटणे स्वाभाविकच असते कारण आपण मनुष्य आहोत दैव नाही.
आजपर्यंत माझा खूप निर्णय चुकले परंतु त्यामागे कारण माझ्या खराब वेळेचे नव्हते तर कारण होते फक्त माझी मानसिकता.....कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहणे फार महत्वाचे असते पण आपल्यापैक्की बरेच जन सुरुवातीचा काळ आपल्या निर्णयावर ठाम असतात परंतु हळू हळू मात्र आपण या ध्येयावरून विचलित होत जाते ....कालांतराने आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे वाटू लागते आणि त्यात आपण त्या वेळेला दोष देणं सुरु करतो ज्या वेळेला आपण तो निर्णय घेतला होता. 
परंतु यात वेळेचा काय दोष ? हि तर आपलीच मानसिकता मग ती सकारात्मक असो व नकारात्मक !!आपण वेळेवर अवलंबून असतो वेळ आपल्यावर अवलंबून नसते .....कितेक विचारवंतानी म्हटले आहेच ना "प्रत्येक क्षण महत्वाचा असतो" आपण हि हे मान्य करतोच ना मग वेळ शुभ अशुभ कशी काय होऊ शकते...आजपर्यंतच्या अनुभवावरून मी एका निष्कार्ष्यापर्यंत पोहचलो की, "माझ्या आयुष्यात वाईट वेळ कधीच नव्हती , जे काही चांगले वाईट प्रसंग आले ते फक्त माझ्या मानण्यावर अवलंबून होते अन राहतील ही !! वेळेने कधीच मला दगा दिला नाही परंतू मीच कित्येकदा वेलेशीच खेळत बसलो अन बरेच काही गमावून धन्यही झालोय. कित्येक वाईट कटू अनुभवातून जीवनाचे खरे रहस्य मला उलगडण्यास मदत झाली. " आणि त्याचच फळ म्हणजे हा माझा ब्लॉग...धन्यवाद !!
                 आई-बाबा,परमेश्वर आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद!!