Friday, 4 October 2013

तू अशी का वागते ?


तू अशी का वागते ? 
तू अशी असशील 

असे वाटले नव्हते !

डोळ्यातून अश्रू कधी
इतके वाहिले नव्हते ! 
तुझ्या निरागस चेहऱ्यामागील
 दु:ख माहित नव्हते !
तुझ्या मनाचे सौंदर्य
कोणीच का पहिले नव्हते ? 
सुंदर चेहऱ्यामागेही
सुदर मन ही  असते !
 तुला भेटलो नसतो तर 
कदाचित कधीच कळले नसते ,,,,,,!!
प्रश्न पडला पडला कितीदा 
तू अशी का वागते ?
नंतर कळले तू ,
मनातून खूप रडते ......
प्रत्येक गोष्टीसाठी ,
मनापसून धडपड करते......
मनासारखी नाही घडली 
कि SOLID चिडचिड करते !!
प्रश्न पडला पडला कितीदा 
तू अशी का वागते ?
पण कशी हि असलीस तरी ,
स्वतःवर रास प्रेम करते ,,,
अगदी राजाच्या मुलीसारखी ,
राजकुमारी वाटतेस !!  

प्रश्न पडला पडला कितीदा 

तू अशी का वागते ?
तुझ्या निरागस चेहऱ्यामागील

 दु:ख माहित नव्हते !
.
.
.
.
.
.
.
.
गोकुळ गायखे
 ९८२१८३७३४३
http://www.facebook.com/DescentCharacter

No comments: