Friday, 4 October 2013

स्टेशनवरचा एक पोरगा

स्टेशनवरचा एक पोरगा
 मुसुमूसू रडत होता ....
    कावराबावरा होऊन बिचारा 
     इकडे तिकडे पाहत होता....
का कुणास ठाऊक पण 
Tension मध्ये वाटत होता....

मिनिटा मिनिटाच्या आयुष्यात
तो क्षण-क्षण मरत होता 
(मी जवळ जाऊन सहज विचारले त्याला )
मित्र !! काय रे झालं ?
तो वर पाहून म्हणाला ...
                               अरे !! मला भरूनच आलं....

                                क्षणातच तो सावरला ...
उठून उभा राहिला ....
खांद्यावर डोकं ठेऊन..
                                 ढसा-ढसा रडत सुटला 

I am sorry यार.....
तिनं दगा दिला 
Don`t call me....
म्हणत फोन कट  केला 


असा म्हणताना तिने विचार नाही केला ?
यातच माझा अर्धा जीव गेला
नंतर कळलं ....
तिच्या प्रेमातच याने JOB सोडून दिला ....

ना प्रेम राहिलं.....
ना काम राहिलं.....
प्रेमामध्ये याचं पुरतं
sandwich झालं



अचानक उठला....
संतापून म्हणाला ....
सोडणार नाही तिला 
     म्हणत धावत सुटला.....

दोनच मिनिटात बिचारा 
चक्कर येऊन पडला ....
आता मात्र येथे
मोठा लोचा झाला....

अर्ध्यातासाने हा शहाणा 
कसाबसा शुद्धीवर आला 
त्याचा पत्ता घेऊन "कुरिअर"
मी घरपोच केला .......


क्षणातच त्याचा मोबाइल वाजला 
थोडस ऐकल्यानंतर..............
 त्यान फोनच फेकून दिला..... 
स्टेशनवरचा प्रकार परत सुरु झाला 
मी मात्र तेथून काढता पाय घेतला... 
प्रेमामध्ये आता बिचारा पुतरा वेडा झाला 
आठवणींच्या गर्दीत पुतरा हरवून गेला 
.
.
.
.
.
.

आठवणींच्या गर्दीत पुतरा हरवून गेला..... 



- गोकुळ द. गायखे 


No comments: