Friday, 4 October 2013

वनवाशी आश्रम - चिंचवनी


प्रोजेक्ट ०१ . वनवाशी आश्रम - चिंचवनी 
कित्येक वेळा काही गोष्टी घडण्यासाठी नशीब असावे लागते हे खरे !! सुरुवातीपासूनच मी HELP TO NEEDY मध्ये LATE कमर होतो. ३-४ दिवसांच्या अथक प्रवासानंतर माझ्या अंगात कणभरसुद्धा जीव नव्हता असे म्हटले तरी हरकत नाही....आणि त्यात रात्रभर झोप पण लागत नव्हती.कल्याण ला आल्यानंतर मी सचिनला नक्की केल कि मी उद्या कोणत्याही परीस्थितीत कॅम्पला येतोय...
अगदी खात्रीशीर...नक्की केलं होतं कि कोणत्याही परीस्थितीत कॅम्पला यायचेच..

२६ जून रोजी सर्वांनी ०८.०० वाजता HDFC सर्कॅलवर जमायचे ठरले होते झाले हि अगदी तसेच ५-६ मोटारसायकॅल घेऊन आम्ही वनवाशी आश्रम - चिंचवनी(शांतीवन आश्रमाजवळ) कडे मोर्चा वळवला..


सचिनच्याच पुढकाराने हा आश्रम निवडला होता म्हणून आम्ही त्याच्या पाठीच होतो कारण पत्ता फक्त त्यालाच माहित होता ...
आश्रमात पोहचलो तेव्हा ०९.०० वाजले होते. गाड्या पार्क केल्यानंतर जरा आश्रमाकडे नजर टाकली तेव्हा जिकडे तिकडे लहान मुलेच ..कुणी आंघोळ करताय तर कुणी झाडलोट तर कुणी बागकाम ....जेव्हा मला समजले हि मुले सकाळी ०५.३० ला उठून आवराआवर करतात तेव्हा जरा नवलच वाटले कारण लवकर उठणे आमच्या दिनक्रमात कुठेच बसत नाही आणि एवढ्या गारठ्यात थंड पाण्याने आंघोळ .....आई ग !!...आम्ही तर विचारच करू शकत नाही. पण बर वाटले कि
"जी गोष्ट आपण उशिरा आत्मसात करतो ती या कोवळ्याजीवनी खूप लवकरच आत्मसाथ केली आहे."
तेथील व्यवस्थापकांशी ओळख वैगरे झाल्यानंतर आम्ही कामाला लागलो आगदी जोमाने ....आम्ही ११-१२ जणांनी कामे वाटून घेतली आणि पाहता पाहता ती काही क्षणातच पूर्णही झाली म्हणजेच प्रत्येकजण आपले १०० % देण्याचा १००% प्रयत्न करत होता आणि हेच HELP TO NEEDY चे शिल्पकार काही तरी नवीन घडवण्याच्या  उद्देशाने खूप धडपडत होते... वह्या आणि चॉकलेट्स वाटण्याचा आमचा कार्यक्रमास उस्फुर्द प्रतिसाद मिळत होता...रोहन साहेबांनी कार्यक्रम सुरु केला त्यात आम्ही प्रत्येकानी स्वतःची ओळख करून दिली आणि एक एक संदेश  देत होतो अगदी  "आपल्या शब्दात"...
आता म्हणाल मी काय संदेश दिला ?
मी काही वक्ता नाही म्हणजेच मी माझ्या शब्दात दिलेला संदेश मुलांच्या मनावर परिणाम करणार हे मला माहित होते मी म्हणालो....
 . "आपले नाव सांगताना नेहमी पूर्ण सांगत जा !!.... उदा. गोकुळ दत्तू गायखे". "प्रत्येक गोष्ट करताना मनापासून करा अभ्यास आणि अगदी भांडणेसुद्धा"(माझ्या या संदेशानंतर सर्वजण हसत होते.) मला त्या गोष्टीचे समाधान वाटले कि डॉ.गजेंद्र सलीमकरांनी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी माझ्या या संदेशास त्यांच्या टाळ्यानी "सॉंलीड" प्रतिसाद दिला अगदी आश्रमातील मुलांनीसुद्धा...

आश्रमातील मुलांनी भजने सादर केली त्यातील एक  अगदी सुदंर भजन तुमच्यासाठी

 सत्यनाम लेना भगवान का नाम लेना !
 सत्यनाम लेना भगवान का नाम लेना !



मां का नाम लेना पिता का नाम लेना !
मां का नाम लेना पिता का नाम लेना !



राम का नाम लेना सीता का नाम लेना !
राम का नाम लेना सीता का नाम लेना !



कृष्ण का नाम लेना राधा का नाम लेना !
कृष्ण का नाम लेना राधा का नाम लेना !



 शंकर का नाम लेना पार्वती का नाम लेना !
 शंकर का नाब लेना पार्वती का नाम लेना !



सत्यनाम लेना_ _ _ _ 

हा कार्यक्रम इतका सुदर झाला कि शब्दात त्याचे वर्णन करणे अशक्य आहे....
दुपारी १२.०० वाजे पर्यंत कार्यक्रमाची सांगता झाली ती डॉ.सलीमकरांच्या भाषणाने
Last But Best प्रमाणे त्यांनी पुन्हा आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडले... 
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रानो आणि डॉक्टर साहेब तुमचेसुद्धा......    

No comments: